ठाणे: वागळे इस्टेट येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनेकांचा शिंदे गटात प्रवेश
Thane, Thane | Nov 10, 2025 आज दिनांक १० नोव्हेंबर रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास वागळे इस्टेट येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुलुंड, विक्रोळी, भांडुप, धुळे शहरातून हजारोंच्या संख्येने काँग्रेस, शरद पवार गट आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी शीख बांधव देखील मोठ्या प्रमाणात शिंदेंच्या शिवसेनेत सामील झालेला पाहायला मिळाला. यानंतर एकनाथ शिंदे यांनी आपल मनोगत व्यक्त केलं आहे.