पालघर: आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्या प्रकरणी विरार येथील तरुणा विरोधात गुन्हा दाखल
विरार पोलीस ठाणे हद्दीतील एका तरुणाने आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी रितेश जोशी यांनी व्हाट्सअपवर आक्षेपार्ह स्टेटस ठेवले. या स्टेटसला पप्पू रातांबे यांनी आक्षेप घेतला, मात्र आरोपीने त्यांना दमदाटी केली आणि धमकी दिली. याप्रकरणी विरार पोलीस ठाण्यात आरोपी रितेश जोशी यांच्या विरोधात आक्षेपारळ स्टेटस ठेवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.