गोंदिया: नगरपरिषद नगरपंचायत निवडणूक क्षेत्रात मतदानाच्या दिवशी आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश
Gondiya, Gondia | Nov 29, 2025 राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक 2025 घेण्यासाठी निवडणूक कार्यक्रम घोषित केला असून 2 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 3 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. सर्व नोंदणीकृत मतदारांनी त्यांच्या मतदानाचा हक्क बजवावा याकरिता निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे सर्व मतदारांना विविध प्रकारचे कार्यक्रम उपक्रम राबवून आवाहन करण्यात आले असून मतदारांचा सहभाग वाढावा याकरिता प्रशासनातर्फे प्रयत्न सुरू आहे.