पालघर: वाळवे गावानाची तरसाचा वावर मोबाईल कॅमेऱ्यात कैद
पालघर तालुक्यातील वाळवे गावानजीक तरसाचा वावर असल्याची घटना समोर आली आहे. वाळवे गाव परिसरात तरस फिरत असल्याचे स्थानिक ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले घटनेची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले, मात्र या तरसाला जेरबंद करण्यात यश आलेले नाही. तरस परिसरात वावर करत असल्याची ही घटना नागरिकांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केली आहे.