कराड: मलकापूर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सत्ताधारी प्रवाहात सामील होण्याचा घेतला निर्णय; मनोहर शिंदे यांची घोषणा
Karad, Satara | Nov 8, 2025 मलकापूर शहरातील उर्वरित विकासकामे मार्गी लावण्यासाठी आणि शहराचा विकास कायम ठेवण्यासाठी सत्ताधारी प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेतला आहे,अशी माजी नगरसेवक मनोहर शिंदे यांनी शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता पत्रकार परिषदेत सांगितले. गेल्या काही वर्षांपासून जलसंपदा,रस्ते, मलनिस्सारण आणि सार्वजनिक सुविधांच्या उभारणीसाठी विविध प्रकल्प सुरू असून, त्यांना गती देणे ही काळाची गरज असल्याचे शिंदे म्हणाले. जनतेने दिलेला विश्वास कायम ठेवून मलकापूरच्या सर्वांगीण प्रगतीसाठी काम करण्याचा माझा संकल्प आहे.