श्रीगोंद्याचे चार हजारहून अधिक मतदार थेट अहिल्यानगर महापालिकेच्या यादीत? राष्ट्रवादी (शरद पवार गट) कडून गंभीर हरकत नगर : अहो आश्चर्य! अहिल्यानगर महापालिकेच्या प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादीत प्रचंड गोंधळ उघड झाला आहे. श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघातील तसेच मांडवगण गणातील तब्बल ४,३८१ मतदारांची नावे महापालिकेच्या यादीत दिसत असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर यांनी आज दुपारी एक वाजता हरकत दाखल करत केला.