ठाणे: कळवा पारसिक नगर येथे इमारतीतून पडला रॉड
Thane, Thane | Nov 8, 2025 आज दिनांक 8 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 च्या सुमारास कळवा पारसिक नगर येथे चालू असलेल्या श्री कृपा डेव्हलपर्स बिल्डरचे बांधकाम सुरु असलेल्या इमारती वरून एक मोठा लोखंडी रोड उंच मजल्यावरून खाली रहदारी असलेल्या रस्त्यावर पडला. एक वृद्ध व लहान मुलगी थोडक्यात बचावले अन्यथा याठिकाणी मोठी दुर्घटना घडली असती. महापालिकेच्या नियमांना धाब्यावर बसून सेफ्टी नियम न पाळता बांधकाम सुरु असतात असा आरोप स्थानिक करत आहेत.