नागपूर शहर: 50 लाखाच्या लूटप्रकरणात पोलिसांची धडाकेबाज कार्यवाही, आरोपी पोलिसांच्या ताब्यात : पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल
पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांनी 17 सप्टेंबरला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार, गोळी झाडून 50 लाखाच्या लूट प्रकरणात पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून तीन दुचाकी, दोन चार चाकी व गुन्ह्यात वापरलेली बंदूक जिवंत काडतूस पाच मोबाईल आणि रोख रक्कम असा एकूण 21 लाख 11 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींना पुढील कारवाईसाठी . ही कारवाई गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. याबद्दलची अधिक माहिती पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र कुमार सिंगल यांनी दिली आहे.