भंडारा: युवाशक्तीचा जल्लोष! पोलीस बहुउद्देशीय सभागृह येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे दिमाखदार आयोजन
क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, भंडारा आणि जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता दरम्यान पोलीस बहुउद्देशीय सभागृह, भंडारा येथे जिल्हास्तरीय युवा महोत्सव 2025-2026 चे उत्साहात आयोजन करण्यात आले. या महोत्सवात जिल्ह्यातील युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विविध कला प्रकारांमध्ये युवकांनी आपल्या सुप्त कलागुणांना वाव देत आपली प्रतिभा, उत्साह आणि ऊर्जा मंचावर सादर केली, ज्यामुळ