रामटेक: नवरगाव येथे भागवत कथेच्या भक्तीरसात बुडाले ग्रामवासी
Ramtek, Nagpur | Nov 7, 2025 रामटेक तालुक्यातील नवरगाव येथे मागील सात दिवसांपासून सुरु असलेल्या श्री काकडआरती भागवत साप्ताहचे समापन शुक्रवार दि. 7 नोव्हेंबर ला सायं. 5 वा. च्या दरम्यान अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात संपन्न झाले. श्री सार्वजनिक हनुमान मंदिर पंचकमेटी श्रीराम नगर नवरगाव द्वारे परिसरात हा सप्ताह संपन्न झाला. भागवत कथेचे रसाळ वाचन ह. भ. प. कैलास लांजेवार महाराज यांनी आपल्या मधुर व प्रभावी वाणीने केले.