साकोली: शासकीय आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी एकोडी येथील धान खरेदी केंद्रावर नोंदणी करण्याचे आवाहन
एकोडी येथील समुत्कर्श अटल अभिनव सर्व सहकारी संस्थेच्या कार्यालयात शेतकऱ्यांनी पावसाळी धान खरेदी करिता नोंदणी बुधवार दि.12 नोव्हेंबरला दुपारी तीन पासून सुरू करण्यात आली आहे शेतकऱ्यांनी अर्ज,सातबारा,गाव नमुना8,व संमती पत्र घोषणापत्र बँक पासबुक आधारकार्ड ही सर्व कागदपत्रे घेऊन धान खरेदी केंद्रावर धान खरेदीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन केंद्र चालक चेतन खेडीकर व वैभव खोब्रागडे यांनी केले आहे