तुमसर: दावेझरी जंगल शिवारात विविध दोन ठिकाणी हातभट्टीच्या दारु अड्ड्यावर सिहोरा पोलिसांची धाड
तुमसर तालुक्यातील दावेझरी जंगल शिवारात सिहोरा पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे दि. 9 नोव्हेंबर रोज रविवार सकाळी 8.30 वा. च्या सुमारास आरोपी राजेश सुभाष कोहळे व आरोपी बबलू भोयर दोन्ही रा दावेझरी यांच्या हातभट्टीच्या दारू अड्ड्यावर धाड घालून आरोपींच्या ताब्यातील मोहपास सडवा व हातभट्टीची दारू असा एकूण 1 लाख 26 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी पोलिसांना पाहताच दोन्ही आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. या प्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध सिहोरा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.