भरधाव ट्रकने दुचाकीस्वारशेतमजुराला जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात कानडगाव (वे.) फाट्यानजिक सायंकाळी घडली. गडबड बारेला (३९) असे मृताचे नाव असून, तो मूळचा खंडवा, मध्यप्रदेश येथील असून सध्या कानडगाव (वे.) येथे मुक्कामी होता. गडबड बारेला हा दिवसभर शेतात मजुरीचे काम करून दुचाकीने गावाकडे परतत होता. छत्रपती संभाजीनगर महामार्गावरून जात असताना समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (क्र. महा ४४-टी-०९९९) जोरदार धडक दिली.