कारंजा: आस्वालीने केले तिघांना जखमी.. हेटीकुंडी गावातील घटना ग्रामस्थांनी दिले वन विभागाला निवेदन गावकऱ्यात भीतीचे वातावरण
Karanja, Wardha | Nov 21, 2025 कारंजा तालुक्यातील जंगल परिसरात असलेल्या हेटीकुंडी गावात येऊन 20 तारखेला अचानक रात्री साडेनऊच्या सुमारास आस्वालीने तीघावर हल्ला केला. जखमींनी व ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्याने अस्वलीने पळ काढला शंकर पट्टे ,ज्ञानेश्वर इंगळे ,व चंद्रकला वाघमारे असे तिघे जखमी झाले असल्याचे सांगण्यात आले या संदर्भात ग्रामस्थांनी आज दिनांक 21 तारखेला वन विभागाला निवेदन दिले आहे आज ही अस्वल सुनील लोखंडे यांच्या शेतात वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना आढळली..