नाशिक: समसेविकेच्या पतीला बलात्काराच्या खोट्या गुण्या अडकवण्याची धमकी देत खंडणीची मागणी
Nashik, Nashik | Nov 24, 2025 नाशिकमधील एमएससीबी कॉलनी परिसरात एका समाजसेविकेला पतीवर खोट्या बलात्काराच्या गुन्ह्यात अडकविण्याची धमकी देत ५ लाखांची खंडणी मागितल्याप्रकरणी चार महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सौ. प्रमिला कैलास मैंद यांनी या बाबत उपनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून आरोपी अर्चना परदेशी, स्नेहल भालेराव, कविता पवार व रंजना कांबळे यांनी संगनमत करून धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पोलीसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.