शिरपूर: बिजासन घाटात दोन ट्रकांची भीषण धडक;चालक कॅबिनमध्ये अडकला, 2 तासांच्या प्रयत्नांनंतर जीव वाचला
Shirpur, Dhule | Nov 20, 2025 मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील बिजासन घाटात शिरपूर तालुका पोलीस चौकीसमोर 20 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी सुमारे 4 वाजेच्या सुमारास भीषण अपघात झाला.उतारावर अचानक ब्रेक फेल झाल्याने भरधाव ट्रकने पुढे जात असलेल्या दुसऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात कंटेनर चालक राहुल राजपूत वय 30, रा.विदिशा,मध्यप्रदेश हा कॅबिनमध्ये गंभीर जखमी अवस्थेत अडकला,तर सहचालक अखिलेश सभुराम बेलवशी वय 31, रा. इटारसी हा किरकोळ जखमी झाला.जखमींना शिरपूर येथे शासकीय अम्ब्युलन्सने हलविण्यात आले आहे.