कुही: सिल्ली-मोहदरा शिवारात दुचाकी घसरल्याने चालकाचा मृत्यू
Kuhi, Nagpur | Oct 31, 2025 दुचाकी चालकाचा ताबा सुटल्याने वेगात असलेली दुचाकी घसरली. दुचाकी वरून पडून चालकाचा मृत्यू झाल्याची घटना पोलीस स्टेशन कुही हद्दीतील सिल्ली-मोहदरा शिवारात घडली. हरिदास बालाजी धानफोले वय 47 राहणार सालाई असे मृतक दुचाकी चालकाचे नाव आहे. ते कूही येथून कामे आटोपून गावाकडे परत जात असताना सिल्ली-मोहदरा शिवारात दुचाकी घसरल्याने चालकाचा ताबा सुटला आणि गंभीर दुखापत झाल्याने चालकाचा मृत्यू झाला.