खटाव: अखेर पुसेगावकरांचा निर्धार फळाला; रखडलेल्या महामार्गाच्या कामाला ग्रामस्थांचा स्वबळावर प्रारंभ
Khatav, Satara | Nov 10, 2025 पुसेगाव, ता. खटाव येथे चार वर्षांपासून रखडलेल्या सातारा–म्हसवड–टेंभुर्णी–लातूर राष्ट्रीय महामार्गाच्या पुसेगाव भागातील रस्त्याचे काम अखेर ग्रामस्थांच्या स्वबळावर सोमवारी सुरू झाले आहे. सोमवारी सकाळी दहा वाजता मारुती मंदिरासमोर सर्वपक्षीय नेते आणि ग्रामस्थांनी रखडलेल्या रस्त्याच्या कामाविरोधात जाहीर रस्ता रोको आंदोलन छेडताच प्रशासन आणि कंपनीला जाग आली. दोन तासांपर्यंत वाहतूक ठप्प राहिली, परंतु अखेर ग्रामस्थांच्या दबावामुळे कामाला सुरुवात झाली.