धानपिसाईसाठी आलेल्या ट्रॅक्टरचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरवर असलेला इसम खाली पडला आणि त्याच क्षणी ट्रॅक्टरचे चाक अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. ४) येरगाव येथील हिंदुस्थान राईसमिलजवळ घडली. गजानन तुकाराम उरकुडे (४०), रा. पिपरीदीक्षित असे मृतकाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच मूल पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.