रामटेक: भारतीय महिला क्रिकेट चमूने विश्व कप जिंकताच गांधी चौक, रामटेक येथे मोठा जल्लोष
Ramtek, Nagpur | Nov 3, 2025 भारतीय महिला क्रिकेट चमूने रवि. दि. 2 नोव्हेंबरच्या रात्री 12 वा.च्या ठोक्याला एक दिवसीय क्रिकेट विश्वकप जिंकताच गांधी चौक रामटेक येथे मोठ्या संख्येने उपस्थित महिला युवक युवती रामटेकवासी यांनी एकच जल्लोष केला. गुलाल उधळला गेला, फटाक्यांची आतषबाजी करण्यात येऊन ढोल संदलच्या तालावर उत्साही महिला नागरिकांनी ठेका धरला. भाजपाच्या महिला आघाडी जिल्हा महामंत्री तथा रामटेक-भगिनी मंडळ रामटेक अध्यक्ष ज्योतीताई कोल्हेपरा, गोपी कोल्हेपरा यांच्या सौजन्याने एलईडी वर सामन्याचा आनंद घेण्यात आला.