हिंगोली: चौफेअर टिकेनंतर जिल्ह्याचे पालकमंत्री अतिवृष्टीग्रस्त भागाची भेट देऊन करणार पाहणी
हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नियुक्त झाल्यानंतर एकदाही जिल्ह्याचा दौरा न करणारी पालकमंत्री नरहरी झिरवाळांना चौफेर टिकेनंतर उपरती झाली असून आता उद्या दिनांक 17 सप्टेंबर रोजी दोन दिवसीय हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येणार असून यावेळी पाचही तालुक्यात भेट देऊन अतिवृष्टीची पाहणी करणार आहेत. याशिवाय अधिकाऱ्यांची बैठकही घेणार आहेत.