अंबरनाथ: अंबरनाथ तहसील येथे एका दुकानावर लागली भीषण आग
अंबरनाथ तहसील येथे रात्री उशिराच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. अंबरनाथ तहसील येथे असलेल्या दुकानाच्या वरून विद्युत लाईन जाते आणि यामध्ये शॉर्टसर्किट झाल्याने त्याची ठिणगी दुकानावर पडली आणि दुकानावर असलेल्या गवताने आणि साहित्याने पेट घेतला. त्यानंतर माहिती मिळताच अग्निशमनदल घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले. कोणतीही जीवित हानी झाली नाही,परंतु अचानक लागलेल्या आगीमुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.