राहुरी नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज मंगळवार (२ डिसेंबर) रोजी सकाळपासून मतदान ला उत्स्फूर्त सुरुवात झाली आहे. नगराध्यक्षपदांसह २२ प्रभागांमधील २५ जागांसाठी हे मतदान होत आहे. एकूण ३३,७५० मतदार या निवडणुकीत आपला हक्क बजावणार असून, ३८ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यापैकी २,००० पेक्षा कमी मतदार असलेल्या ८ केंद्रांची निवडणूक आयोगाने “अतिसंवेदनशील” म्हणून नोंद केली आहे.