निफाड: रस्त्याच्या प्रश्नावरून सुरू असलेले रुई येथील आमरण उपोषण स्थगित
Niphad, Nashik | Nov 22, 2025 रुई खेडले झुंगे रस्ता हा महत्त्वाचा मार्ग गेल्या अनेक वर्षांपासून खराब अवस्थेत असल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते. रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीच्या मागणीसाठी रुई (ता. निफाड) येथील ग्रामस्थांनी १९ नोव्हेंबरपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले होते. उपोषणाचा आज तिसरा दिवस असताना अखेर रस्त्या