फलटण: फलटण येथील डॉ. संपदा मुंढे प्रकरणातील संशयित आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यास केले बडतर्फ
फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्य वैद्यकीय अधिकारी डॉ. संपदा मुंढे यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदने यास सेवेतून बडतर्फ करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांनी बुधवारी दुपारी २ वाजता पत्रकारांना दिली. बदने यास पोलीस दलाचे पूर्ण ज्ञान असताना बेफिकिरीने, नैतिक अधःपतन व दुर्वतन, विकृतपणे पोलीस उपनिरीक्षक पदाचा गैर वापर म्हणून त्यास बडतर्फ करण्यात आले.