उल्हासनगर: शहाड येथील पुलावर मालवाहू टेम्पो पलटी
शहाड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आज दिनांक 3 नोव्हेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास शहाड पुलावर एक छोटा मालवाहू टेम्पो पलटी झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार वळण घेत असताना हा टेम्पो पलटी झाला. या टेम्पो मध्ये एक लहान मूल देखील होतं. मात्र सुदैवाने या लहान मुलाला आणि टेम्पो चालकाला कोणतीही दुखापत झाली नाही. घटना घडल्यानंतर स्थानिकांनी तात्काळ धाव घेतली व टेम्पो उभा केला आणि टेम्पो मधल्यांना रस्त्याच्या कडेला नेऊन बसवलं.