भुसावळ: भुसावळातील भोळे महाविद्यालयात स्वच्छता ही सेवा अभियान प्रारंभ
भुसावळ येथील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात स्वच्छता ही सेवा अभियान २०२५ या उपक्रमाला सुरुवात झाली. त्यानुसार, दिनांक १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानाचा भाग म्हणून महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे दिनांक १७ सप्टेंबर रोजी "स्वच्छतोत्सव" हा उपक्रम राबवित स्वच्छता अभियान राबविण्यात आल्याची माहिती महाविद्यालय प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.