मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिलेल्या निर्णयामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा अक्षरशः खेळखंडोबा झाल्याचा संताप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केला आहे. या गोंधळाला राज्य सरकार व निवडणूक आयोग जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.