कामठी: काँग्रेसने जमीन चोरीच्या लावलेल्या आरोपावर भाजपा पदाधिकाऱ्यांचे प्रत्युत्तर, भाजपा कार्यालय येथे पत्रकार परिषदेचे आयोजन
Kamptee, Nagpur | Sep 17, 2025 प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेतर्फे काँग्रेसच्या माजी सभापती यांनी भाजपावर जमीन चोरीचा खळबळजनक आरोप केला होता. आज यावर जयस्तंभ चौक स्थित भाजपा कार्यालय येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये प्रत्युत्तर देण्यात आले असून माजी सभापती अवंतिका लेकुरवाळे यांच्या आरोपांचे खंडन करण्यात आले आहे. दरम्यान याचे उत्तर जनता देईल असा इशारा देखील यादरम्यान देण्यात आला आहे.