श्रीगोंद्यात बचत गट घोटाळा; दोन महिलांवर गुन्हा दाखल श्रीगोंदा तालुक्यातील बचत गटांच्या समुदाय गुंतवणूक निधीमध्ये तब्बल २५ लाख २० हजार रुपयांच्या गैरव्यवहाराचा पर्दाफाश झाला आहे. विस्तार अधिकारी सारिका हराळ यांच्या फिर्यादीवरून रोहीणी बाळकृष्ण जगताप उर्फ जौंजाळ (रा. बाबुर्डी) आणि वंदना सुरेश उकांडे (रा. बेलवंडी बु.) यांच्यावर बेलवंडी पोलिस ठाण्यात आज दुपारी १ वाजता गुन्हा दाखल झाला.