*एचआयव्ही जनजागृती रॅलीमध्ये अडीच हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग* अमरावती, दि. 04 (जिमाका): दरवर्षी 1 डिसेंबर हा जागतिक एड्स दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त अमरावती शहरात आज 'भव्य एड्स जनजागृती रॅली’चे आयोजन करण्यात आले. ‘अडथळ्यावर मात करू, एकजुटीने एड्सला लढा देऊ, नवपरिवर्तन घडवू’ या घोषवाक्यासह शहरातील अडीच हजाराहून अधिक विद्यार्थी आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.