रामटेक: कालिदास स्मारकाची दुर्दशा दूर करणार; नगरपरिषद रामटेकचे अपक्ष उमेदवार आकाश ढोबळे यांची ग्वाही
Ramtek, Nagpur | Nov 29, 2025 न.प.रामटेक अंतर्गत येणाऱ्या गडमंदीर परिसरातील महाकवी कालिदास स्मारकाची व परिसराची दुर्दशा झाली आहे. याकडे कुणाचेही लक्ष नाही. मी नगरपरिषद रामटेक च्या निवडणुकीत यशस्वी झालो तर कालिदास स्मारक व परिसराची दुर्दशा दूर करणे माझी प्राथमिक कर्तव्य राहील. अशी ग्वाही अपक्ष उमेदवार आकाश ढोबळे यांनी शनिवार दिनांक 29 नोव्हेंबरला सायंकाळी पाच वाजता च्या दरम्यान या प्रभागाच्या दौरा करताना उपस्थित पत्रकारांना दिली.