एका व्यावसायिकाच्या वाहन चालकास पैशांच्या देवाण-घेवाणीवरून आठ ते नऊ जणांच्या टोळक्याने कोयता, दांडक्याने मारहाण केली. यावेळी जीव वाचण्यासाठी संबंधित व्यक्तीने केलेल्या गोळीबारात एकाचा जागीच मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत.ही घटना बुधवारी (दि. 3) रात्री साडेनऊच्या सुमारास कामशेत पोलीस ठाणे हद्दीतील मुंढावरे गावजवळील इंद्रायणी ढाब्याजवळ घडली.