केज: बारावीत शिक्षण घेत असलेल्या तरुणाने, साबला गावात राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली
Kaij, Beed | Nov 29, 2025 बारावीच्या वर्गात शिकत असलेल्या युवकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना साबला ता. केज येथे घडली. रामेश्वर अशोक पांचाळ असे या आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव असून त्याने आत्महत्या का केली ? याचे कारण स्पष्ट झाले नाही. साबला ता. केज येथील रामेश्वर अशोक पांचाळ हा युवक केज येथील वसंत विद्यालयात इयत्ता बारावीच्या वर्गात शिक्षण घेत होतारामेश्वर व त्याचे वडील अशोक पांचाळ हे केजहून गावात आले. वडील हे गावात सत्यनारायणच्या कार्यक्रमास गेले. तर रामेश्वर हा घराकडे आला होता.