चोलामंडलमचे कर्ज न फेडल्यामुळे कोहिनूर महाविद्यालयाला काही दिवसांपूर्वी सील करण्यात आले होते. त्यामुळे महाविद्यालयाचा अध्यापन सध्या शहरातील चिश्तिया महाविद्यालयात तात्पुरते सुरू होता. अखेर मा. उच्च न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर व आदेशानुसार आज कोहिनूर महाविद्यालयाचे कुलूप अधिकृतरीत्या उघडण्यात आले आहे. विद्यार्थ्यांमध्ये व पालकांमध्ये दिलासा आणि समाधानाचे वातावरण पसरले आहे.