ठाणे: ठाणे मनपा मुख्यालयात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतला विकासकामांचा आढावा
Thane, Thane | Nov 10, 2025 परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज दि १०नोव्हेंबर रोजी दुपारी १२च्या सुमारास ठाणे महानगरपालिका मुख्यालयात विशेष भेट देऊन महापालिका आयुक्त सौरव राव यांच्यासोबत शहरात सुरू असलेल्या विविध महत्त्वाच्या विकासकामांचा सविस्तर आढावा घेतला. विशेषतः ठाणे शहरातील पायाभूत सुविधा आणि वाहतूक कोंडी कमी करण्याच्या प्रकल्पांवर या बैठकीत भर देण्यात आला. घोडबंदर रोडची कामे, घोडबंदर रोडवरील सेवा रस्त्यांचे काम तातडीने पूर्ण करणे, मेट्रो प्रकल्पांचा आढावा आणि अन्य रस्त्यांची कामे यावर सविस्तर चर्चा झाली.