माजलगाव: पुरुषोत्तमपुरीत टायर जाळून आंदोलन
माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरी येथे, आज रविवार दि. 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता शेतकरी संघटनेतर्फे टायर जाळून आंदोलन करण्यात आले. ऊसाला योग्य भाव मिळावा आणि शेतकऱ्यांच्या विविध मागण्या तातडीने सोडवाव्यात, यासाठी हे आंदोलन झाले. सदर मागण्यांसाठी उद्या सोमवार, दि. 24 नोव्हेंबर रोजी, माजलगाव शहरातील परभणी चौक येथे सकाळी 11 वाजता आणखी एक आंदोलन आयोजित केले आहे. या आंदोलनात मोठ्या प्रमाणात सहभागी होण्याचे आवाहन संघटनेतर्फे करण्यात आले आहे.