इंदापूर: नीरा नरसिंहपूर बंधाऱ्याचे बर्गे चोरणारी टोळी गजाआड; 8 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त
Indapur, Pune | Nov 3, 2025 इंदापूर तालुक्यातील नीरा नरसिंहपूर येथील शेवरे बंधाऱ्यासाठीचे लोखंडी बर्गे चोरणाऱ्या चोरट्यांना गजाआड करण्यात इंदापूर पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी 6 जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 8 लाख 60 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.