सात ते आठ गुन्हे दाखल असलेल्या अंबादास उर्फ अमोल वाघ ची दहशत संपवा. वारंवार धमक्या, मानसिक त्रास आणि खोट्या फिर्यादीमुळे युवक त्रस्त.सदर इसमाला अटक करण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे तक्रार.. शेवगाव तालुक्यातील टाकळी येथील राहुल बाळासाहेब फुल्हारे या युवकाने अमोल वाघ याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. अमोल वाघ हा कित्येक दिवसांपासून मानसिक छळ, शिवीगाळ करत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे.