शिरपूर: शिरपूर शहरात पोलिसांची धडाकेबाज कारवाई;आमोदे येथील अट्टल गुन्हेगाराला दिंड काढत दाखवला धाक
Shirpur, Dhule | Nov 25, 2025 शिरपूर तालुका व परिसरात दहशत माजवणाऱ्या अट्टल गुन्हेगार आकाश भाईदास भिल रा.आमोदे, ता.शिरपूर,जि.धुळे याला शहर पोलिसांच्या डीबी पथकाने जेरबंद करून मंगळवार, 25 नोव्हेंबर 2025 रोजी सायंकाळी साडेपाच वाजता शिरपूर शहरात दिंड काढत गुन्हेगारीला चपराक दिली. या कारवाईने शहरात कायद्याचे राज्य असल्याचा संदेश देत इतर गुन्हेगारांमध्ये दहशत निर्माण केली असून नागरिकांनी पोलिसांच्या या धाडसी पावलाचे स्वागत केले आहे