आंबेगाव: बिबट्या हल्ल्याचा रोषः पुणे-नाशिक महामार्गावर २२ तास रास्ता रोको ! | आंदोलन, ग्रामस्थांवर गुन्हे दाखल
Ambegaon, Pune | Nov 8, 2025 पिंपरखेड (ता. शिरूर) येथील १३ वर्षीय रोहन विलास बोंबे या बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर संतप्त जनसमुदायाच्या रोषाला उधाण आले. या घटनेच्या निषेधार्थ विविध पक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी ३ नोव्हेंबर रोजी पुणे-नाशिक महामार्गावरील नंदी चौक, भोरवाडी (ता. आंबेगाव) येथे जबरदस्त रास्ता रोको आंदोलन केले.