रामटेक: आमडी पुलावर अज्ञात वाहनाच्या धडकेत अज्ञात व्यक्तीचा जागीच मृत्यू ; शवाच्या उडाल्या चिंधड्या
Ramtek, Nagpur | Nov 27, 2025 नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील आमडी उड्डाणपुलावर गुरुवार दि. 27 नोव्हेंबरला पहाटे झालेल्या एका भीषण अपघातात एका अज्ञात वाहनाने एका अनोळखी व्यक्तीस जोरदार धडक देत चिरडून टाकले. यात त्या व्यक्तीचा जागीच करूण अंत झाला. धडक इतकी भीषण होती की मृतकाच्या शवाच्या पार चिंधड्या चिंधड्या उडाल्या होत्या. पोलिसांना त्याचे छिन्न विच्छिन्न अवयव एका कापडात जमा करावे लागले.