जळगाव: हनुमान नगरात गटारीत पडलेल्याने प्रौढाचा दुदैवी मृत्यू; एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव शहरातील हनुमान नगरात राहणारे ४२ वर्षीय प्रौढ व्यक्ती हे गटारीत पडल्याने त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास समोर आली आहे. याबाबत रात्री ८ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शंकर मधुकर बाऊस्कर वय ४२ रा. हनुमान नगर, जळगाव असे मयत झालेल्या प्रौढाचे नाव आहे.