फुलंब्री: फुलंब्री शहरातून जाणाऱ्या जळगाव राष्ट्रीय महामार्गावर महात्मा फुले चौकात वाहतूक ठप्प दोन किलोमीटर पर्यंत वाहनाच्या रांगा
फुलंब्री शहरातून जाणाऱ्या छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गावर महात्मा फुले चौकाच्या परिसरामध्ये सुमारे दोन किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. त्यामुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागला.पोलिसांनी सदरील वाहतूक पूर्ववत केली.