मतदानाच्या ई.व्ही.एम. च्या स्ट्रॉंग रूमचे एलईडी स्क्रिनवर वर थेट प्रक्षेपण करावे व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना सदर ठिकाणी पाहणी करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवारांनी प्रकाश मारोटकर यांच्या नेतृत्वात आज ४ डिसेंबर गुरुवार रोजी दुपारी दीड वाजता नांदगाव खंडेश्वर येथील निवडणूक अधिकारी व निवडणूक आयोगाकडे केली आहे. राज्यात २ डिसेंबर रोजी नगरपरिषद नगरपंचायत निवडणुका पार पडल्या असून ३ डिसेंबर रोजी सदर निवडणुकीचा निकाल...