औसा: संत ज्ञानेश्वर महाराजांच्या २५ व्या पुण्यस्मरणात गुरुवर्य चैतन्य महाराजांचे पावसा येथे भावपूर्ण कीर्तन
Ausa, Latur | Dec 1, 2025 औसा -श्रीक्षेत्र गोपाळपूर येथे नाथ संस्थानचे चौथे पीठाधीपती सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज औसेकर यांच्या २५ व्या पुण्यस्मरण महोत्सवात ३० नोव्हेंबर रोजी गुरुवर्य श्री चैतन्य महाराज देगलूरकर यांनी कीर्तन सेवा केली. ज्ञानोबा-तुकोबा सारखे भक्त मिळणे देवाचे भाग्य असा उपमा देत, अप्पा (ज्ञानेश्वर महाराज औसेकर) यांच्या चित्तात देव वसला जो हृदयात प्रगट केला असे चिंतन मांडले. आप्पा गेले असे मानत नाही, ते विचार-कार्याने आजही वावरतात, अशी श्रद्धा व्यक्त केली.