उदगीर: दहा लाखासाठी महिलेचा सोलापूर येथे छळ, सासरच्या सहा लोकांवर उदगीर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Udgir, Latur | Nov 25, 2025 उदगीर येथील महिलेचा सोलापूर येथे सासरच्या लोकांनी दहा लाखासाठी छळ केल्या प्रकरणी सासरच्या सहा लोकांवर २४ नोव्हेंबर रोजी रात्री उशिरा उदगिर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, फिर्यादी महिला तबसुम शारूख जागीरदार वय ३० वर्ष हिस सासरच्या लोकांनी लग्नानंतर दोन महिने चांगले नांदवले, दोन महिन्यानंतर माहेरून १० लाख रुपये घेवून ये म्हणून सासरच्या लोकांनी २०१८ ते आजपर्यंत मौलाना आझाद चौक सोलापूर येथे शारीरिक व मानसिक छळ करून घराबाहेर हाकलून दिले.