औंढा नागनाथ: अंजनवाडा सह औंढा नागनाथ तालुक्यात रब्बीच्या पेरणीला वेग सरासरी 52 टक्के पेरणी पूर्ण कृषी विभागाची माहिती
औंढा नागनाथ तालुक्यात थंडीचा जोर वाढताच शेतकऱ्यांकडून रब्बीतील गहू, हरभरा,करडई सह इतर रब्बीतील पीक पेरणीला सुरुवात केली असून तालुक्यातील अंजनवाडा, सिद्धेश्वर, गोळेगाव, जवळा बाजार येहळेगाव सोळंके सह विविध भागात सध्या रब्बीतील पीक पेरणीला वेग आला आहे दरम्यान तालुक्यात सरासरी 52% रब्बीची पेरणी पूर्ण झाल्याची माहिती औंढा नागनाथ तालुका कृषी विभागाने दिनांक 12 नोव्हेंबर बुधवार रोजी सायंकाळी साडेपाच वाजे दरम्यान दिली आहे