अंजनगाव सुर्जी तालुक्यातील बोराडा शेतशिवारात शेतीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये आज दुपारी १ वाजता जोरदार हाणामारीची घटना घडली.कुटुंबातील सदस्य एकमेकांवर तुटून पडताच परिसरात एकच गोंधळ माजला.घटनेची माहिती मिळताच अंजनगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.मात्र हाणामारी सुरूच राहिल्याने कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठी चार्ज करावा लागला.काही वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आले.