पंढरपूर: पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात नवरात्रीची तयारी सुरू, मौल्यवान दागिने गाठवण्याला सुरुवात
नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात मोठ्या उत्साहात तयारीला सुरुवात झाली आहे. मंदिरातील शेकडो वर्षांपासून जपलेले मौल्यवान दागिने गाठवण्याचे काम सुरू असल्याची माहिती आज बुधवार, दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास देण्यात आली आहे. या दागिन्यांमध्ये सोन्याचे अलंकार, हिरे, माणिक, मोती असे अनमोल रत्नजडित दागिने आहेत. यामुळे नवरात्रीच्या काळात विठ्ठल-रुक्मिणी मातेचे रूप अधिकच मोहक व आकर्षक दिसणार आहे.